साहित्य :-
- १ वाटी मसूर डाळ
- ५-६ हिरव्या मिरच्या
- ४ लसूण पाकळ्या
- १ सें.मी. आले ( बारीक तुकडा )
- २ कांदे, २ बटाटे, २ टोमाटो
- अर्धी वाटी ओले खोबरे
- अर्धा चमचा साखर
- ४ चमचे तेल किंवा तूप
- अर्धा चमचा मोहरी, १ चमचा मीठ
- १ चमचा गरम मसाला पावडर
- मिरच्या, आले व लसूण जाडसर खरडावी किंवा कुटावी व डाळीत हा खडा घालून डाळ शिजवावी.
- बटाटे उकडावे व टोमाटो शिजवावे. कांदे सोलून बारीक चिरावे.
- बटाटे सोलून चिरावे. डाळीत टोमाटो, बटाटे, मीठ, साखर व खोबरे घालावे. एका लहान पातेलीत तेल तापले की त्यात मोहरी घालावी.
- कांदा घालून परतावा व गरम मसाला त्यात घालून ही फोडणी डाळीवर ओतावी.
- ५-७ मिनिटे डाळ मंद आचेवर उकळू द्यावी.
- पोळी किंवा भाताबरोबर वाढावी.
No comments:
Post a Comment