साहित्य :-
- छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे
- चिमुटभर हिंग १/२ चमचा हळद
- १ चमचा मिरची पावडर १ मध्यम आकाराचा कांदा
- २ कप दही
- ४-५ तमालपत्राची पाने १ चमचा आलं, लसूण पेस्ट
- ४ चमचे तेल
- १/२ कप दुध
- मीठ चवीनुसार.
- २ वेलदोडे
- ७-८ मिरे
- १ चमचा धने
- १/४ चमचा शहाजिरे ४-५ लवंगा
- १ लहान दालचिनी.
कृती :-
- पहिला मसाल्याचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून बाजूला ठेवावे.
- बटाटे प्रथम धुवून बेताचे उकडून सोलावेत.
- कढईत तेल तापवून सर्व बटाटे खमंग तळावेत व बाजूला ठेवावेत.
- कढईत बटाटे तळून उरलेले तेल थोडे कमी करावे व उरलेल्या तेलात कांदा, हिंग, तमालपत्र आणि आलं लसूण पेस्ट घालून परतावे.
- हे मिश्रण गुलाबी रंगावर परतला गेला की तेल सुटू लागते.
- नंतर त्यात बारीक वाटून ठेवलेला मसाला मिक्स करून २-३ मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवावे.
- नंतर त्यात हळद, मिरची पावडर आणि मीठ घालून परतावे.
- नंतर तेल सुटायला लागले की गॅॅस मोठा करून दही आणि दुध घालून डावाने घोटावे.
- मिश्रण जाड वाटल्यास थोडे उकळते पाणी घालून ढवळावे.
- नंतर त्या मिश्रणात तळलेले बटाटे घालून परतावे.
- सर्व मसाला बटाट्यांना सर्वत्र लागला पाहिजे. आणि गॅॅस बंद करून भाजीला दोन चांगल्या वाफा द्याव्यात.
आवडत असल्यास सजावटीसाठी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
.jpg)
No comments:
Post a Comment