Thursday, May 18, 2023

चॉकलेट केक ( कंडेन्स मिल्क )






चॉकलेट केक ( कंडेन्स मिल्क ) साहित्य :- 

  • मैदा २ १/४ कप 
  • कंडेन्स मिल्क अर्धा डबा 
  • २ मोठे चमचे पिठी साखर 
  • २ मोठे चमचे कोको पावडर 
  • ३/४ कप तूप/लोणी 
  • १ कप थम्स अप/कोको कोला 
  • १/२ टीस्पून खायचा सोडा व बेकिंग पावडर प्रत्येकी 
  • चिमुटभर मीठ 
कृती :- 

  • मैदा, मीठ, सोडा, बेकिंग पावडर व कोको पावडर एकत्र चाळून घ्या. 
  • तूप, पिठी साखर व कंडेंन्स मिल्क एकत्र फेटून घ्या. ह्या मिश्रणात थोडं थोडं मैद्याच मिश्रण मिसळा.
     
  • नंतर त्यात थम्स-अप मिसळा. थम्स अपच प्रमाण आवश्यकतेनुसार कमी-जास्त करा. 
  • मिश्रण साधारण ओतता येईल असे असावे. मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात ओता व अतिसूक्ष्मलहर भट्टीत ६०% वर किंवा ५४० डिग्रीवर १० मिनिटे भाजा. 
  • १० मिनिटे भट्टीत तसाच राहू द्या. थंड झाल्यावरच कापा म्हणजे केक व्यवस्थित कापल्या जातो. 

No comments:

Post a Comment