Thursday, May 4, 2023

दुधी भोपळ्याचे सूप


p> 

आज आपण कधीही बनवलेली नसेल अशी रेसिपी बनवणार आहोत, ती रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याचे सूप.

साहित्य :- 

  • एक मध्यम आकाराचा कोवळा दुधी भोपळा 
  • एक कांदा 
  • लसूण, हिरवी मिरची, आले, यांचे बारीक तुकडे चवीनुसार, 
  • मीठ 
  • मिरी 
  • लवंग, दालचिनी 
  • तूप, जिरे 
  • बटर / लोणी 
कृती :-
 

  • दुधी चे तुकडे करून, दुधी आणि कांद्याचे तुकडे, आले, मिरची, लसूण हे सर्व कुकरमध्ये घालून ३ शिट्या करून घ्याव्यात. पाणी घालू नये. 
  • नंतर मिश्रण मिक्सर वर फिरवून घ्यावे. 
  • कढईत तूप घालून गरम करून, जिरे, हिंग, मिरी, लवंग, दालचिनी हे घालून परतावे. 
  • मग त्यात तयार ग्रेव्ही घालून, गरज वाटल्यास थोडेसे गरम पाणी घालून मीठ घालावे. 
  • बटर / लोणी घालून गरमागरम सर्व्ह करावे. 
  • चवीसाठी वरून थोडी मिरपूड घालावी. 

No comments:

Post a Comment