Saturday, May 6, 2023

रताळ्याचे गोड काप


 

साहित्य : 

  • २ कप रताळ्याचे काप 
  • १/४ कप साखर 
  • १ चमचा वेलदोडा पूड 
  • २ चमचे ड्रायफ्रुट 
  • ३ चमचे ओले खोबरे 
  • २ चमचे साजूक तूप 

कृती : 

  • प्रथम रताळे स्वच्छ धुवून त्याचे गोल पातळ असे काप करून घेणे. नंतर हे काप पाण्याने स्वच्छ धुवून घेणे. 
  • कढई मध्ये तूप घालून ते गरम करून घेणे. तूप गरम झाले की त्यात बारीक कापलेले गोल रताळ्याचे काप घालून २ मिनिटे परतून घेणे. 
  • नंतर ड्रायफ्रुट चे तुकडे व खोवलेले ओले खोबरे घालून सगळे हलवून घेणे. 
  • नंतर त्या वर झाकण ठेवून 5-7 मिनिटे छान ते काप शिजवून घेणे. गॅॅस मध्यम आचेवर ठेवावा. 
  • हे काप शिजले की त्यात वेलदोडा पूड व आवडीनुसार साखर बारीक करून घालणे. 
  • हे रताळे काप साखर विरघळे पर्यंत हलवत राहणे. व पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घेणे. 
  • साखर विरघळत आली क रताळे काप क्रीस्पो होण्यास लागतात. मस्त सुगंध यायला लागतो. अशाप्रकारे छान क्रिस्पी असे हे गोड रताळ्याचे काप तयार झाले. 

No comments:

Post a Comment