Tuesday, May 16, 2023

कच्च्या पपईची भाजी



साहित्य : 

  • तीन वाट्या फोडी होतील एवढी मध्यम आकाराची पपई 
  • लाल सुक्या मिरच्या एक-दोन 
  • भिजवलेली हरभरा डाळ वा मूग डाळ पाऊन वाटी किंवा भिजवलेले वाटाणे अर्धी वाटी 
  • तेल 
  • मीठ, तिखट 
  • धणेपूड, गूळ चवीपुरता 


कृती : 

  • पपईची साल नीट काढून तिच्या बेताच्या आकाराच्या फोडी कराव्यात. 
  • फोडणी करून त्यात प्रथम भिजवलेली डाळ टाकून थोडी परतून घ्यावी. 
  • त्यावर पपईच्या फोडी टाकून परताव्यात. वाफा आल्यावर अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवावं. 
  • मंद आचेवर डाळ व भाजी शिजल्यावर मीठ, गूळ चवीपुरते घालावं. 
  • तिखट, धणेपूड घालून अलगद ढवळावी. वरून खोबर, कोथिंबीर घालावी. 
  • भाजीत गरम पाणी घालावं. एकसारखी ढवळू नये. 
  • अशा प्रकारे पपईची भाजी तयार होईल. 

No comments:

Post a Comment