Tuesday, May 16, 2023

टोफू बर्गर


 



साहित्य :-

१) ४ बर्गरचे पाव

२) १०० ग्राॅॅम टोफू 

३) २ कांदे 

४) १ टोमॅॅटो

५) १ लाल मिरची 

६) ४ चीज स्लाईस 

७) १/२ वाटी लेट्युस 

८) रांच ड्रेसिंग 

९) मीठ 

१०) मिरे पूड 

११) तेल. 




कृती :- 

१) टोफूचे तुकडे करून कढईत तेल घालून गरम करून गुलाबी रंगावर भाजणे. 

२) त्यात कांद्याचे तुकडे, लाल मिरची घालून गुलाबी होईपर्यंत भाजणे. 

३) मीठ आणि मिरे पूड घालून चांगले हलवणे. मिश्रणाचे ४ भाग करणे. 

४) प्रत्येक पावावर चीजचा स्लाईस ठेवून मिश्रणाचा एक भाग ठेवणे. 

५) त्यावर लेट्युस, टोमॅॅटो केचप आणि रांच सॉस घालून दुसरा पाव ठेवणे व खायला देणे. 

 


No comments:

Post a Comment