Sunday, May 28, 2023

सिंधी बेसन करी


 



साहित्य :- 

  • ५ टीस्पून बेसन 
  • १ चिंच, ३-४ आमसुले 
  • ७-८ भेंड्या, १०-१२ गवारीच्या शेंगा 
  • १०० ग्रॅम दुधी, १-२ छोटी गाजरे 
  • २ मोठे बटाटे 
मसाला : 

  • १/२  चमचा मेथी, १/२ चमचा जिरे 
  • १/२ चमचा मोहरी, थोडा हिंग 
  • ३-४ हिरव्या मिरच्या, ३-४ लाल मिरच्या 
  • थोडा कडुलिंब, १ मोठी चिरलेली कोथिंबीर
  • थोडे तिखट, मीठ, ३-४ टीस्पून तेल.
कृती :- 

  • थोड्या पाण्यात चिंच भिजत घालावी. १ लिटर पाणी उकळायला ठेवावे. त्यात चिंचेचा कोळ घालावा. 
  • भाज्यांचे तुकडे ह्या पाण्यात शिजवून घ्यावेत. २ टीस्पून डाळीचे पीठ १ ग्लास पाण्यात घालून सारखे करावे.
  • एका पातेल्यात तेल तापत ठेवावे. नंतर त्यात मोहरी, जिरे व मेथी घालून फोडणी करावी. त्यावर उरलेले डाळीचे पीठ घालून लालसर होईपर्यंत परतावे.
  • नंतर त्यात वरील भाज्यांचे गरम पाणी, हळद, वाटलेल्या मिरच्या, कडुलिंब, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. 
  • उकळी आली की गार पाण्यात कालवलेले पीठ ओतावे.
  • आमसुले व भाज्यांचे तुकडे घालावे. करी गरमच वाढावी. 

No comments:

Post a Comment