साहित्य :
कृती :
- १७५ ग्रॅॅम (१ कप ) रवा
- ४० ग्रॅॅम मिल्क पावडर
- १ कप साखर
- १/४ चमचे वेलची पूड
- १-१/२ कप दूध
- तेल
कृती :
- सगळे साहित्य जमा करून घ्या. पॅॅन मध्ये साखर घालून १ कप पाणी घाला उकळी आल्यावर वेलची पूड घाला. आता पाक दोन ते तीन मिनिट उकळून घ्या गॅॅस बंद करा.
- आता कढईत दुध घालून उकळी काढा आता त्यात रका हाताने रवा घाला व दुसऱ्या हाताने ढवळत रहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. मिल्क पावडर घालून चांगले एकजीव करून घ्या.
- आता पाच मिनिटे कढईवर झाकण ठेवून लो मिडीयम फ्लेमवर वाफवून घ्या. गरमागरम ताटात काढून रवा चांगला मळून घ्या गोळा मऊ व्हायला हवा.
- आता छोटे छोटे गोळे करून घ्या व गुलाबजाम वळून घ्या. वळताना गोळा व गुलाबजाम कपड्याने झाका कोरडे व्हायला नको म्हणून .
- कढईत तेल घालून गरम करा लो फ्लेमवर तेल जास्त गरम नको एका वेळी ७-८ गुलाबजाम कढईत टाका म्हणजे तेलाचे टेंप्रेचर मेंटेन राहील.
- असे सगळे गुलाबजाम तळून घ्या. आता पाक गरम करा व त्यात गुलाबजाम घाला.
- ७-८ तास पाकात मुरु द्या. मुरल्यानंतर सर्व्ह करू शकता.
- अशा प्रकारे रव्याचे गोड गुलाबजाम तयार होतील.
No comments:
Post a Comment