आज आपण भरली अंडी कधी बनवतात ते पाहुया.
साहित्य :-
- ६ अंडी
- ६ लहान बटाटे
- २ चिरलेले टोमॅटो
- २ चमचे तेल
- १ बारीक चिरलेला कांदा
- १/२ नारळाचा कीस
- ३ लसूण पाकळ्या
- २ हिरव्या मिरच्या
- अर्धा इंच लांबीचा आल्याचा तुकडा
- १/२ चमचा तिखट
- १/२ चमचा हळद
- १ चमचा गरम मसाला
- कोथिंबीर चिरलेली
- अंडी आणि बटाटे उकळून त्यांना मधून चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात आधी कांदे-लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे.
- नारळाचा बुरासुद्धा परतून घ्यावा. हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, नारळ व कांदे लसूण, मीठ, गरम मसाला, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करावी.
- अंडी आणि बटाट्यात हे मिश्रण सावधगिरीने भरावे.
- तेल गरम करून त्यात बाकी उरलेले कांदे व टोमॅॅॅटोला परतावे. नानात्र त्यात भरलेले बटाटे, अंडी व उरलेला मसाला घालावा.
- थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. कोथिंबीर ने सजवून सर्व्ह करावे.

No comments:
Post a Comment