Monday, May 1, 2023

घरगुती पद्धतीने टेस्टी चिकू आईस्क्रिम





चिकूचे आईस्क्रिम बनवण्याचे साहित्य :- 
  • १० चिकू 
  • १/२ कप ताजी मलई 
  • १ कप साखर 
  • ३०० मिली दुध 
  • १/२ कप दुध पावडर 

चिकूचे आईस्क्रिम बनवण्याची कृती  :- 
  • सर्वप्रथम चिकू स्वच्छ करून सोलून घ्या आणि चिकूच्या बिया काढून कापून घ्या. 
  • आता हे चिकूचे तुकडे 
  • मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची प्युरी बनवा. 
  • यानंतर एका मोठ्या भांड्यात दुध, मिल्क पावडर,  मलई आणि साखर घालून चांगले मिक्स करा. 
  • आता या मिश्रणात चिकू प्युरी आणि चांगले मिसळा. 
  • सर्व साहित्य नीट मिसळून झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा आणि आटवा.
  • २ तासानंतर आईस्क्रिम बेस पुन्हा ब्लेंड करा आणि त्याच कंटेनरमध्ये पुन्हा ठेवा. 
  • सुमारे ३ तासानंतर आईस्क्रिम बेस काढून टाका आणि पुन्हा चांगले मिसळा. 
               आता ते हवाबंद करा आणि ८-१० तास घट्ट करण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर त्यावर फळे किंवा चिकूच्या तुकड्यांनी सर्व्ह करा.    

No comments:

Post a Comment