मेथी पराठा बनवण्याचे साहित्य :-
- १ कप गव्हाचे पीठ
- १ कप मेथीची पाने
- ३.४ कप योगर्ट
- २ चमचे लसूण पेस्ट
- १ चमचे साखर
- १ चमचे कॅॅरम सीड
- १ चमचे तीळ
- १ चमचे तूप
- आवश्यकतेनुसार हळद
- २ चमचे मिरची पावडर
- आवश्यकतेनुसार मीठ
एका बाऊलमध्ये १ वाटी गव्हाचं कणिक आणि १ वाटी मेथीची पान घेऊन व्यवस्थित मिक्स करा. या मिश्रणात १ चमचा ओवा, १ चमचा तीळ, ३ चमचे लसणाची पेस्ट, चिमुटभर हळद, १ चमचा लाल तिखट पावडर टाकून सर्व साहित्य चांगली मिक्स करून घ्या. पिठात साखर, मीठ आणि अर्धा कप दही टाकून मिश्रण एकजीव करा. हा पिठाचा गोळा थोडासा तेल घालून चांगला मळून घ्या. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्या. कणिकेला पराठ्यासारखा गोल आकार द्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या आणि त्या प्रत्येक गोळ्याला पराठ्यासारखा गोल आकार द्या. पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्या तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी चांगला खुसखुशीत भाजून घ्या.
पराठा भाजताना त्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा साजूक तूप घाला, तयार झाले आपले गरमा गरम, खमंग आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे तयार झाले. या मेथी पराठ्यांचा तुम्ही सकाळी व संध्याकाळी चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता. हे पराठे तुम्ही दही, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता.
No comments:
Post a Comment