साहित्य :-
- १/२ कप घट्ट दही
- २०० ग्रॅम पनीर
- टोमॅटो - १
- उकडलेला बटाटा - १
- कोथिंबीर
- भोपळा मिरची - १
- २-३ हिरव्या मिरच्या
- थोडंस आलं
- १/२ लिंबू
- लोणी
- काळंं मीठ चवीनुसार
- कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घ्या.
- बटाटा, टोमॅटो आणि भोपळी मिरचीचे स्क्वेअर तुकडे कापून घ्या. पनीरचे पण मोठे स्क्वेअर तुकडे कापा.
- आता दह्यात मीठ, लिंबाचा रस, पनीर, वाटण आणि भाज्या मिसळून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या.
- नंतर स्टिकमध्ये पनीर, भोपळी मिरची, टोमॅटो आणि बटाट्याचे तुकडे लावा. वरून लोणी लावून मायक्रोवेवमध्ये शेकून घ्या.
- त्यानंतर सर्व एका प्लेटमध्ये काढा आणि सर्व्ह करा.
- अशाप्रकारे तयार आहे उपवासाचा पनीर टिक्का.
No comments:
Post a Comment