साहित्य :
- ३ कच्ची केळी
- मीठ चवीनुसार
- १ चमचा हळद
- तळण्यासाठी तेल
- प्रथम कच्ची केळी सोलून घ्या आणि त्याचे पातळ काप करा.
- आता एका वाडग्यात पाणी मीठ आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करा. आता यामध्ये केळ्याचे पातळ काप १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर चाळणीवर निथळत ठेवा.
- एकीकडे कढई तापत ठेवा मग यात तेल घालून मध्यम आचेवर केळ्याचे काप खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या.
- सोनेरी रंगाचे झाल्यावर एका बाउलमध्ये काढून घ्या.
- अशा प्रकारे तयार झाले आपले खमंग कुरकुरीत केळ्याचे वेफर्स.
No comments:
Post a Comment