साहित्य :
- मध्यम आकाराचा एक पापलेट
- दोन चमचे बेसन
- एक चमचा आलं-लसूण पेस्ट
- एक चमचा लिंबू रस
- अर्धा चमचा हळद
- एक चमचा फिश मसाला
- एक चमचा लाल तिखट
- गरजेनुसार रवा
- एक चमचा धणेपूड
- मीठ आणि तेल
- सर्वात आधी पापलेट नीट धुवून घ्यावं. त्याला आडवे काप द्यावेत.
- आता या पापलेटला लिंबू रस चोळून घ्यावा.
- त्यानंतर हळद व आलं-लसूण पेस्ट लावावी. ते कपांमध्ये नीट चोळावंं व झाकून ठेवावंं.
- साधारण एक-दीड तास मॅॅरीनेट होवू द्यावं.
- प्लेटमध्ये बेसन, लाल तिखट, फिश मसाला, धनेपूड आणि मीठ एकत्र करावं.
- पापलेट मॅॅरीनेट झाल्यावर एका प्लेटमध्ये घ्यावं. त्याला बेसन वैगरे मिसळून केलेला मसाला चांगला लावून घ्यावा. मसाला लावल्यानंतर पापलेट रव्यात घोळवून घ्यावं.
- एका नॉनस्टिक पॅॅनमध्ये थोडं तेल गरम करत ठेवावं. तेल गरम झालं, की त्यावर मसाला लावलेला पापलेट अलगद ठेवावा व चांगला शेकून घ्यावा.
- शेकत असताना मधेमधे चमचानं थोडा दाबत राहावा. असं केल्यामुळे पापलेट सगळ्या बाजूनंं खरपूस शेकला जातो.
- साधारण पाच मिनिटांत एक बाजू शेकली जाते. नंतर दुसरी बाजू तशीच शेकून घ्यावी. दोन्ही बाजू शेकून झाल्या, की प्लेट मध्ये काढावे.
No comments:
Post a Comment