Tuesday, April 25, 2023

फणसाची पोळी


 

साहित्य : 

  • फणस 
  • साखर १ कप 
  • तूप
     

कृती : 
  • फणस कापून त्यातला गर काढून घ्या व बिया वेगळ्या करा. 
  • गर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्या. 
  • एका मोठया भांड्यात घेऊन गॅॅसवर ठेवून ढवळत राहा. 
  • त्यात साखर घालून मिश्रण एकत्र करा. व ढवळा. 
  • साधारण ७-८ मिनिटांनी मंद आचेवर शिजवा. त्याचा रंग व घनता काही प्रमाणात बदलेली दिसेल. 
  • काही मोठया ताटांत तूप लावून घ्या. 
  • तटांवर पळीन मिश्रण पसरवा. पसरताना फार जाड नाही व फार पातळ नाही अशा पद्धतीने पसरवा. 
  • उन्हामध्ये २ - ३ दिवस वाळत ठेवा. 
  • अशा प्रकारे फणसाची गोड पोळी तयार होईल.
  

No comments:

Post a Comment