Monday, April 17, 2023

हिरव्या मुगाचा पौष्टिक डोसा

 

साहित्य : 

  • १/२ कप हिरवे मूग 
  • ४ हिरव्या मिरच्या 
  • १० कडीपत्त्याची पाने
  • १ चमचे जीरे 
  • १ तुकडा आलं 
  • चवीनुसार मीठ 
  • आवश्यकतेनुसार पाणी 
  • ३ चमचे तेल 
कृती : 

  • सर्वप्रथम हिरवे मूग पाण्यात ४ तास भिजत ठेवा. मग भिजून झाल की पाणी काढून टाका. मग मिक्सर मध्ये मूग, हिरवी मिरची, आलं, जीरे, कडीपत्ता हे टाकून आवश्यकतेनुसार पाणी घेऊन पेस्ट करून घ्या. 

  • पेस्ट करून झाल्यावर त्यात लगेच चवीनुसार मीठ टाका. डोश्याच पीठ सारखं बॅॅटर करा मग तवा घ्या तो जास्त गरम करायचा नाही त्याला तेल लावा मग डोसा सारखं टाका. मग दोन्ही बाजूने खरपूस करून घ्या.  

  • मग तयार पौष्टिक हिरव्या मुगाचे डोसे ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता. 

अशा प्रकारे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे तयार होतील. 

No comments:

Post a Comment