Monday, April 17, 2023

कैरीचा मुरांबा


 साहित्य : 

  • २५० ग्रॅॅम कैरी 
  • १०० ग्रॅॅम गूळ 
  • २ लवंग 
  • १/४ चमचा वेलची पावडर 
कृती : 
  • प्रथम एक कैरी घेऊन टी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. आणि कैरीची साल काढून घेतली. 

  • मग साल काढून घेतलेली कैरी किसणीवर किसून घेतली.

  • नंतर कढई गरम झाल्यावर त्यात किसून घेतलेली कैरी घातली. आणि १०० ग्रॅॅम गूळ घालून मंद गॅसवर ठेवून, गूळ पूर्ण वितळवून घेतला. आणि पाक १५ ते २० मिनिटे शिजवून घेतले. व त्यात एक छोटा चमचा वेलची पावडर, ३-४ लवंग घालून चांगले परतून घेतले. मग त्यात थोडे मीठ घालून, पाकची तार आली, म्हणजे आपला कैरीचा मुरांबा तयार झाला 

  • आता आपला कैरीचा मुरांबा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. हा मुरांबा उन्हाळ्यात पोळी किंवा भाकरी बरोबर खूप सुंदर लागतो. 


अशा प्रकारे कैरीचा आंबट गोड मुरांबा तयार होईल. 

No comments:

Post a Comment