साहित्य :
- 1 कप बारीक रवा
- 1/२ कप दही
- 1/४ कप पाणी
- 1 कांदा बारीक चिरून
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- आलं बारीक चिरून
- कडीपत्ता बारीक चिरून
- मोहरी
- मीठ चवीनुसार
- 1/२ चमचे खायचा सोडा
- कोथिंबीरॅॅॅॅ
- 1/२ कप सिमला मिरची
- 1/२ चमचे तिखट
- बाऊलमध्ये रवा, दही, पाणी एकत्र करा उरलेले 1/४ कप पाणी शेवटी घालायचे आहे.
- मिश्रण छान मिक्स करून घ्या. 1/२ तास झाकून ठेवावे.
- पॅॅनमध्ये तेल गरम करून त्यात, कडीपत्ता, मोहरी, कांदा, सिमला मिरची, आलं छान परतून थंड करा.
- तयार मिश्रण रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्या. आणि त्यात मीठ कोथिंबीर, तिखट, सोडा, 1/४ कप पाणी घालून मिश्रण छान मिक्स करून घ्या.
- आप्पे पात्र गरम करून त्यात तेल सोडून हे मिश्रण ओतून आप्पे खरपूस भाजून घ्या.
- अशा प्रकारे स्वादिष्ट रवा आप्पे तयार होतील.

No comments:
Post a Comment