साहित्य :
भात करण्यासाठी
- ५०० ग्रॅॅम बासमती तांदूळ
- ४ हिरवी वेलची
- १ इंच दालचिनी
- ३-४ लवंग
- २ तमालपत्र
- ८ उकडलेली अंडी
- ३ कांदे
- ४ टेबलस्पून तेल
- ४ चमचे जीरे
- १ इंच दालचिनी
- २ लवंग
- २ हिरवी वेलची
- १ मसाला वेलची
- ३ कांदे बारीक चिरून
- ३ टोमॅॅटो बारीक चिरून
- ४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
- १/२ कप दही
- २ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
- १ चमचा धणे जीरे पावडर
- १ चमचा लाल तिखट
- १ चमचा बिर्याणी मसाला
- १/४ चमचे हळद
- १/४ कप दूध
- १०-१५ केशर काड्या
- १/२ कप कोथिंबीर
- १/४ कप पुदिना
- मीठ चवीनुसार
- बरिस्ता करण्यासाठी कांदा उभा पातळ कापून त्याला हळद मीठ लावून पंधरा मिनिट ठेवावे. नंतर पिळून घेऊन गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यात भिजत ठेवावे साधारण एक तास दुधात केशर भिजत ठेवावे.
- भात करण्यासाठी मोठया पातेल्यात मीठ व खडा मसाला घालून पाणी उकळण्यास ठेवावे.पाण्याला उकळी आली की खडा मसाला काढून घ्यावा व त्यात भिजवलेले तांदूळ घालून ८० टक्के भात शिजवावा. नंतर चाळणीत ओतून ठेवावा. असे केल्याने भात मोकळा होतो.
- कढई मध्ये चार चमचे तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा गरम मसाला घालावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा, नंतर त्यात क्रमाने आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या टोमॅॅटो घालावा व टोमॅॅटो मऊ होईपर्यंत शिजवावे. अर्धा बरिस्ता घालावा.
- टोमॅॅटो मऊ झाला की त्यात धणे जीरे पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट घालून मध्यम आचेवर परतावे. लागल्यास पाव कप पाणी घालावे. आता गॅॅस स्लो करून त्यात दही मिक्स करावे व तेल सुटेपर्यंत परतावे.
- पॅॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून त्यात प्रत्येकी चिमुटभर मीठ, हळद घालून त्यावर उकडलेली अंडी परतावी.
- मसाल्याला तेल सुटले की त्यात चवीनुसार मीठ घालावे. त्यात अंडी परतावी, थोड पाणी घालून एक उकळी आणावी.
- आता एक टोपात तळाशी तेल लावावे, त्यावर १/३ भात पसरावा. त्यावर एक चमचा केशर मिश्रित दूध, कोथिंबीर, पुदिन्याची पान पसरावी, त्यावर तयार केलेला अर्धा मसाला, २-३ अंडी, बरिस्ता, गुलाबपाणी घालावे, परत असाच थर लावावा.
- गॅॅस वर तवा गरम करून त्यावर बिर्याणीचा टोप ठेऊन पंधरा ते वीस मिनिट स्लो गॅॅस वर ठेवावी.

No comments:
Post a Comment