Monday, April 17, 2023

कुरकुरीत आणि खमंग कोबी मंचुरियन

कोबी मंचुरियन बनवण्यासाठी साहित्य :

  • २ मध्यम आकाराचा फुलकोबी 
  • २ चमचे काॅॅर्न फ्लोअर 
  •  ४ चमचे टोमॅॅटो केचअप 
  • ४ सुक्या लाल मिरच्या 
  • ३  चमचे लसून पेस्ट 
  • १ कप चिरलेला हिरवा कांदा 
  • २ चमचे चिरलेली हिरवी मिरची 
  • १ कप पाणी 
  • १ कप रिफाइंड तेल 
  • २ मध्यम शिमला मिरची 
  • २ चमचे मीठ 
  • १/२ चमचे अजिनोमोटो
  • ३ चमचे आले पेस्ट 
  • २ चमचे मसाला तिखट 
  • ४ चमचे सॉस 
  • १ कप मैदा 
कोबी मंचुरियन कसे बनवायचे ? 
  • पाण्यात सर्व भाज्या नीट धुवून तयारी सुरु करा. 
  • पुढे फुलकोबी मध्यम आकाराच्या फुलांमध्ये कापून घ्या. 
  • मंचुरियनसाठी पीठ तयार करण्यासाठी  एका मध्यम आकाराच्या भांड्यात भाज्या, मैदा, काॅॅर्न फ्लोअर, आले आणि लसून पेस्ट, मीठ आणि तिखट मिसळा. 
  • हे सर्व मिसळल्यानंतर थोडेसे पाणी घालून पीठ तयार करा. आणि छोटे छोटे गोळे करा. 
  • आता एक पॅॅन मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात तेल गरम करा. 
  • तयार पिठात गोळे काळजीपूर्वक बुडवा आणि गरम तेलात टाका. ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर त्यांना पेपर नॅॅपकिनवर काढा आणि बाजूला ठेवा.
  • आता दुसऱ्या गॅॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात थोडे तेल गरम करा. 
  • कढईत उरलेले आले आणि लसून पेस्ट, कोरडी लाल मिरची, हिरवी मिरची घालून एल मिनिट परतून घ्या. 
  • नंतर कढईत चिरलेली सिमला मिरची आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करावे. 
  • पॅॅनमध्ये सॉससह अजिनोमोटो घाला आणि चांगले मिसळा. 
  • शिमला मिरची अर्धी शिजली की पॅॅनमध्ये तळलेले मंचुरियन घाला आणि सर्व साहित्य एकत्र करण्यासाठी पुन्हा टाॅॅस करा. 
अशा प्रकारे कुरकुरीत आणि खमंग कोबी मंचुरियन तयार होतील. 

No comments:

Post a Comment