Tuesday, April 25, 2023

यम्मी बासुंदी


 

साहित्य : 

  • २ लिटर दूध 
  • ४-५ केशर 
  • २ चमचे वेलचीपूड 
  • २ चमचे काजू, बदाम, पिस्त्याचे काप
  • १/२ वाटी साखर
     

कृती : 

  • सर्व दूध कधीही एकदम तापवू नये, प्रथम एक लिटर दूध आटवत ठेवावे. गॅॅसवर जाड बुडाच्या कढईत दूध आटवावे. 
  • दूध निम्मे राहिले की पहिले आटलेले दूध बाजूला ठेवावे व दुसरे दूध आटवण्यास ठेवावे. 
  • निम्मे झाले की दोन्ही दूध एकत्र करावी. केशर गरम करून चुरून घालावे.
  • साखर घालावी, वेलची पूड आणि बदाम-पिस्त्याचे कापही घाला. बासुंदी नेहमी घट्ट झाली पाहिजे. 
  • मोठया गॅॅसवर थोडे थोडे दूध आटवत ठेवले म्हणजे त्याचा रंग चांगला राहतो. बासुंदी गॅॅसवरून खाली उतरवल्यावर थंड होईपर्यंत ढवळत राहावे. म्हणजे वरती साय धरणार नाही व ती साय बासुंदीत मिसळून जाईल व तोंडातही येणार नाही. 
  • अशा प्रकारे चविष्ट बासुंदी तयार होईल. ती तुम्ही गरमागरम किंवा थंड करून देखील खाऊ शकता.
     

No comments:

Post a Comment