साहित्य :
- १ वाटी गव्हाचे पीठ
- २ मोठे चमचे चण्याचे पीठ
- अर्धी वाटी साखर
- वेलची पूड
- पिवळा खाण्याचा रंग
- चवीनुसार मीठ
- तूप
- प्रथम गव्हाच्या पिठामध्ये चण्याचे पीठ एकत्र करावे.
- नंतर साखर व पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- मिश्रण दाटसर राहील इतकेच पाणी घालावे. त्यात मीठ, वेलची पूड, खाण्याचा रंग व थोडेसे मोहन म्हणून तूप घालून चांगले घोटावे.
- मंद आचेवर कढईत १ चमचा तूप घालून तापल्यावर १ डाव मिश्रण घालावे.
- थोड्या वेळाने झाऱ्याने उलटे करून मालपुआ दुसऱ्या बाजूने परतावा तसेच आवश्यकतेनुसार कडेने थोडे तूप सोडावे.
- नंतर मालपुआ एका प्लेट मध्ये काढून घ्यावा.
- अशा प्रकारे गोड मालपुआ तयार होईल.
No comments:
Post a Comment