Tuesday, April 25, 2023

प्रसादाचा शिरा


 


साहित्य : 

  • सव्वा पाव रवा 
  • सव्वा पाव साखर 
  • सव्वा पाव तूप 
  • ३/४ लिटर दूध 
  • २ चमचे वेलची, जायफळ पावडर 
  • २ केळी
  • १/४ वाटी मिक्स कापलेले ड्रायफ्रुट 
  • १ चमचा किसमिस
  • १० ते १२ केशर दुधात खल्लेलं एक चमचा दूध
     

कृती : 

  • जाड बुडाच्या कढईमध्ये तूप घालून ते गरम करत ठेवावं त्यामध्ये रवा मंद गॅॅसवर खमंग भाजावा त्याचा रंग बदलून सगळीकडे सुगंध दरवळू लागल्यावर आता त्यात केली काप घालून अजून २ मिनिट परतावे मग त्यामध्ये कोमट दूध घालावे व छान परतावे. 
  • दूध घालून झाल्यावर दूध कमी वाटत असल्यास अजून दूध घालावे. 
  • मग साखर घालून सगळ एकजीव करून मिडीयम गॅॅसवर परतत राहावे 
  • शेवटी वेलची पावडर केशर व किसमिस घालून सगळ एकजीव करावं. 
  • मिडीयम गॅॅसवर दोन ते तीन मिनिट अजून तूप सुटेपर्यंत मिश्रण परतत राहावे. 
  • मग गॅॅस बंद करावा व शिरा प्लेट मध्ये काढून घ्यावा. 
  • अशा प्रकारे प्रसादीचा गोड शिरा तयार होईल.
     

No comments:

Post a Comment