साहित्य :- १) जाड शेव, एक वाटी, २)बारीक चिरलेला कांदा एक, ३) बारीक चिरलेला टोमॅॅटो एक, ४) आलं, लसूण पेस्ट (एक चमचा), ५) बेडगी मिरची लाल तिखट, ६) अर्धा चमचा धने पावडर, ७) बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी, ८) जिरे, ९) मोहरी, १०) हळद, ११) तेल, १२) मीठ.
कृती :-
- कढईत तेल तापवून त्यात मोहरी आणि जिरे तडतडून घ्या.
- आता त्यात कांदा आणि टोमॅॅटो घालून परता.
- कांदा, टोमॅॅटो मऊ होण्यास सुरुवात झाल्यावर त्यात आलं, लसणाची पेस्ट घाला.
- सर्व साहित्य परतल्यावर त्यात हळद, लाल, तिखट, निम्मी कोथिंबीर, धने पावडर आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत परता.
- मिक्सरच्या भांड्यात दोन लहान चमचे शेव फिरवून घ्या आणि ती मिश्रणात घाला.
- सगळ्यात शेवटी या मिश्रणात दोन वाट्या गरम पाणी घाला.
- गरम पाणी घातल्याने रश्श्याला लाल तर्री येईल.
- खायला देताना वाटीत शेव, त्यावर गरम रस्सा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
- ही भाजी काही मिनिटात तयार होते. पोळी, भात, रोटी आणि ब्रेडसोबत खाता येते.

No comments:
Post a Comment