Saturday, April 15, 2023

मेथीदाण्याचे आंबट गोड लोणचे

 


सर्वप्रथम १ वाटी मेथी दाणे घ्या . त्या मेथी दाण्याला ३ तास पाण्यात भिजवत ठेवा. ३ तासानंतर त्याला थोड १० ते १५ मिनिट सुखवून मेथीदाण्याला एका सुती कापडात त्याची पुरचुंडी बांधून एका बंद डब्यात ठेवा. ८ तास जेव्हा मेथीदाण्याला मोड (कोंब) आलेले दिसतील तेव्हा ते लोणच्यासाठी तयार.

साहित्य :-   

  • १ वाटी मेथीदाणे (मोड आलेले)
  • १ वाटी गूळ 
  • २ लिंबाचा रस 
  • अर्धी वाटी मोहरीची डाळ 
  • १/२ चमचा हळद 
  • मीठ चवीनुसार 
  • १/२ चमचा हळद 
  • तिखट (आवडीनुसार)
  • १ ते दीड वाटी तेल  
कृती :-

        प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल थोडं थंड झालं की त्यात मोहरीची डाळ, तिखट, हळद, हिंग टाकून ते तेल थंड होऊ द्या. तेल थंड होईपर्यंत एका पसरट भांड्यात मोड आलेले मेथीदाणे टाका, त्यात चवीनुसार मीठ टाका, गुळ टाकून आणि छान हलक्या हाताने मिक्स करा. आता या मेथीदाण्याच्या मिश्रणावर ते थंड झालेलं लोणच्याचा मसाला (तेल) टाका आणि वरून लिंबाचा रस टाकून परत छान मिसळा. मेथीदाण्याचे लोणचे तयार.   

No comments:

Post a Comment