Tuesday, April 25, 2023

कुरकुरीत शेव


साहित्य : 

  • १/४ कप पाणी 
  • १/४ कप तेल 
  • चवीपुरते मीठ 
  • १/२ ते ३/४ कप बेसन 
  • १/४ चमचा हळद 
  • १/२ चमचा ओव्याची पूड 
  • तेल तळण्यासाठी
     

कृती : 

  • तेल, ओवापूड आणि पाणी एकत्र करून फेसून घ्यावे. नीट एकजीव होऊ द्यावे. मिश्रण चांगले पांढरे झाले पाहिजे. या मिश्रणात चवीपुरते मीठ आणि हळद घालून मिक्स करावे. 
  • यामध्ये चमचा-चमचा बेसन घालून चांगले घोटावे. बर्यापैकी घट्टसर मिश्रण करावे. पातळ अजिबात नको, पण एकदम पिठाचा गोळाही मळू नये.
  • सोर्यामध्ये बारीक शेवाची ताटली बसवावी व आतल्या बाजूने तेलाचा हात लावावा.
  • काढईत तेल गरम करावयास ठेवावे. मिश्रण सोर्यामध्ये भरून गरम तेलात आतून बाहेर असे २-३ वेळा गोलाकारात शेव पाडावी.मिडीयम हाय फ्लेमवर शेव तळून घ्यावी. जास्तवेळ तळू नये, यामुळे शेवचा रंग बदलतो. 
  • तळलेली शेव टिश्यू पेपरवर काढावी. नंतर शेव हलक्या हाताने चुरडून घ्यावी. 
                      अशा प्रकारे कुरकुरीत शेव तयार होतील.
 

No comments:

Post a Comment