सोयाबीन मसाला अतिशय चवदार आणि स्वादिष्ट डिश आहे. हे तयार करणे खूप सोपे आहे. सोयाबीन मसाला ही एक खूप चवदार आणि मसालेदार भाजी आहे. मुले व मोठी माणसे सुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स व फायबर जास्त प्रमाणात असते, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही बाजारातून फक्त सोयाबीन आणा व चटकदार सोयाबीन मसाला बनवा. खाली दिलेल्या पद्धतीनुसार हे स्वादिष्ट सोयाबीन बनवा आणि या भाजीचा आस्वाद घ्या.
साहित्य :-
- सोयाबीन
- टोमॅॅटो मध्यम आकाराचे
- मिरची १
- आलं १/२ इंच
- लसूण पाकळ्या १०/१२
- कसुरी मेथी १ चमचा
- जिरे १ चमचा
- तमालपत्र १
- लवंग २
- दालचिनी १ इंच
- दही १/२ कप
- १ चमचा धणे पूड
- कांदे २
- हळद १/४ चमचे
- लाल मिरची पावडर १/२ चमचा
- तेल १/४ चमचे
- मीठ चवीनुसार.
** सर्वपथम भांड्यात पाणी घेऊन गरम करण्यासाठी गॅॅस वरती ठेवायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून पाणी तीन ते चार मिनिटे उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचे आहे.
** पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये सोयाबीन शिजवण्यासाठी टाकायचे आहेत. गॅॅस मध्यम आचेवर असणे जरुरीचे आहे. सोयाबीन खूप हलके असल्यामुळे लवकर शिजतात. सोयाबीन शिजण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटे इतकाच वेळ लागतो. चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर ते आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे.
** याचा मसाला करण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामध्येच आपण आलं, लसूण आणि मिरची सुद्धा घालायची आहे.
** कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत हे सर्व पदार्थ परतून घ्यायचे आहेत. सोनेरी कांदा झाल्यावर हे मिश्रण एका बाजूला ठेवायचे आहे.
** उकडलेल्या सोयाबीन मधले पाणी आपल्याला पिळून काढायचे आहे आणि जे उरलेले पाणी आहे ते आपल्याला ग्रेव्ही साठी वापरायचे आहे.
** आपले जे कांदा-लसूण भाजून घेतलेले मिश्रण आहे ते मिक्सरच्या साह्याने पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे.
** यानंतर एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे अआहे आणि सोयाबीन त्यामध्ये परतायचे आहेत.
** चांगला सोनेरी रंग येईपर्यंत याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. भाजून घेतल्यानंतर ते एका साईडला काढायचे आहेत. आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झाले की त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये दोन लवंग, दालचिनी आणि एक तमालपत्र घालून फोडणी द्यायची आहे.
** आपण जे मिक्सरमध्ये वाटण केले होते ते या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे. आणि यामध्ये थोडी कसुरी मेथी सुद्धा टाकायची आहे. (कसुरी मेथी ही ऑप्शनल आहे.)
** थोडा डार्क रंग येईपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये दही आणि मसाला पावडर हे पदार्थ एकत्रित करायचे आहे. हे मिश्रण तुम्हाला तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहे.
** दोन ते तीन मिनिटात तेल सुटल्यावर यामध्ये टोमॅॅटो प्युरी टाकायची आहे (मिक्सरमध्ये टोमॅॅटो बारीक करून प्युरी बनवली आहे.
** चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचे आहे. मीठ टाकल्यानंतर चांगले तेल सुटेल. यानंतर यामध्ये सोयाबीन घालायचे आहेत. हे सोयाबीन या मसाल्यांमध्ये मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत. परतल्यानंतर या मसाल्यांची चव त्या सोयाबीनमध्ये मुरते.
** यानंतर सोयाबीन उकडलेले पाणी यामध्ये टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर कढईवर झाकण ठेवून याला मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्यायचे आहे.
** पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सोयाबीनच्या भाजीला लालसर असा मस्त रंग आलेला असेल खमंग असा सुंगध सुटलेला असेल.
अशा प्रकारे तयार आहे भन्नाट अशी सोयाबीनची भाजी खायला ही अप्रतिम आहे.
No comments:
Post a Comment