साहित्य :
- १ कप ज्वारीचे पीठ
- १/४ कप फ्रेश दही
- १/२ कप मेथीचे पाने कापून
- १/२ कप कोथिंबीर
- १ टेबलस्पून हिरवी मिरची, लसूण ठेचा
- १ टेबलस्पून पांढरे तीळ
- १/४ टीस्पून ओवा
- १/४ टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग
- १/२ टीस्पून लाल तिखट
- मीठ चवीनुसार
- १ चमचा तेल
कृती :
- मेथीची पाने तोडून घ्या. कोथिंबीर निवडून घ्या, स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या.
- हिरवी मिरची, लसूण, जीरे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या, किंवा खलबत्त्यात कुटुन घ्यावे, बाकीचे साहित्य एकत्र जमा करून ठेवा.
- वाटी मध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात दही, हळद, हिंग, मीठ, हिरवी मिरची लसूण ठेचा, ओवा सर्व घालून मिक्स करा.
- व लागेल तसे पाणी घालून सैलसर बॅॅटर बनवून घ्या.
- आता मेथीची पाने आणि कोथिंबीर घालून मिक्स करा व दहा मिनिटे झाकून ठेवा.
- मिडीयम गॅॅसवर तवा गरम करून घ्या. घावण च्या बॅॅटर मध्ये एक टेबलस्पून तेल घालून मिक्स करा व तव्याला तेल लावून टिश्यू पेपर णे पुसून घ्या आणि तव्यावर तीळ भुरभुरावे व पळीने बॅॅटर पसरवून घ्या,
- वरून तीळ भुरभुरावे, तेल किंवा तूप घालून झाकण ठेवा.
- दोन तीन मिनिटांनी झाकण काढून घावण पालटून घ्या अशा प्रकारे सर्व घावण खरपूस भाजून घ्या

No comments:
Post a Comment