Saturday, April 22, 2023

झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव


 

साहित्य : 

  • १ कप मोड आलेली मटकी 
  • १ कांदा 
  • १ टोमॅॅटो
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तेल 
  • १/४ चमचे जिरे 
  • १/४ चमचे मोहरी 
  • १/८ चमचे हळद 
  • १/४ चमचे धणे पूड 
  • १/४ चमचे लाल तिखट 
  • १/४ चमचे कशिमीरा मिरची पावडर 
  • १/८ चमचे मिसळ मसाला 
  • चवीनुसार मीठ 
  • ४-५ लसूण पाकळ्या  
  • २ तुकडे सुख खोबरे 
  • १ चमचा तीळ 
  • १ चमचा खसखस
  • ७-८ कढीपत्याची पाने
  • १ लिंबू 
  • मिक्स फरसाण 
  • पाव 
  • २ आले चे तुकडे 
  • १/८ चमचे हिंग
     
कृती : 

  • प्रथम आपण मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून चाळणीत ठेवून द्यावी. मग एक कढई मध्ये थोडे तेल घालून त्यात खोबरे, आले, लसूण पाकळ्या, तीळ, खसखस हे सर्व भाजून बारीक वाटून घ्यावे.
  •  नंतर कांदा, टोमॅॅटो बारीक चिरून घ्यावे मग एक कढई मध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, घालून फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे थोडा वेळ परतून झाल्यावर त्यात टोमॅॅटो घालून परतावे मग लसूण पाकळ्या, खोबरे ,आले, तीळ, खसखस हे सर्व बारीक केलेलं मिश्रण घालून छान परतून घ्यावे मग त्यात सर्व मसाला 
  • घालून तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात मटकी घालून परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करावे 
  • मंद आचेवर शिजू द्यावे म्हणजे छान तरी येते आपली मिसळ तयार होईल. 
  • मग एका ताटामध्ये पाव, फरसाण बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि एक वाटी मध्ये मिसळीचा रसा मस्त गरम गरम सर्व्ह करावे. 
  • मसाले आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता , गरम पाण्यामुळे रसाला तरी येते 
                 अशा प्रकारे झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव तयार होईल.  

No comments:

Post a Comment