Tuesday, April 18, 2023

फ्लॉवर-गाजराचे लोणचे

 

साहित्य : 

  • 1 किलो कॉलीफ्लॉवर 
  • ५०० ग्रॅॅम गाजरे
  • १०० ग्रॅॅम आले
  • १०० ग्रॅॅम लाल सुक्या मिरच्या 
  • 1 जुडी पुदिना 
  • २५ ग्रॅॅम दालचिनी 
  • २० ग्रॅॅम मिरी
  • २० ग्रॅॅम लवंग 
  • ५ कप व्हिनीगर
  • २५० ग्रॅॅम गूळ, २५० ग्रॅॅम तेल
  • २५० ग्रॅॅम मीठ ५० ग्रॅॅम लसूण 
कृती: 

  • कॉलीफ्लॉवर स्वच्छ  करून बारीक चिरावा. पाने व मधला दांडोरा टाकून द्यावा. किंवा सूपमधे उपयोग करावा. 
  • गाजराच्या इंचभर लांबीच्या पातळ व बारीक कापट्या चिराव्या. 
  • धुतलेली भाजी पातळ फडक्यावर पसरून कोरडी होऊ द्यावी. पुदिन्याची पानेखुडावी. 
  • आले किसावे व लसूण सोलावी. लाल मिरच्यासह आले-लसूण-पुदिना थोडेसे व्हिनीगर घालून बारीक वाटावे. 
  • लवंग, दालचिनी व मिरी यांची कुटून बारीक पूड करावी. 
  • गुळात उरलेले व्हिनीगर घालून जाड पाक करावा व बाजूला ठेवावा. भाज्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, कुटलेली पूड व मीठ एकत्र मिसळावे.
  • एका रुंद तोंडाच्या बरणीत भरावे.त्यावर गुळाचा गार झालेला पाक ओतावा  व चांगले वाळवावे.
  • चौपदरी दादरा बांधून ७-८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज सकाळी हलवावी.
  • संध्याकाळी घरात आणून ठेवावी. आठवड्यानंतर लोणचे वापरण्यास हरकत नाही. मात्र बरणी कोरड्या जागी ठेवावी. 
अशा प्रकारे फ्लॉवर- गाजराचे लोणचे तयार होईल. 

No comments:

Post a Comment