Tuesday, April 18, 2023

ब्रेड पॅॅटीस

 

साहित्य :

बॅॅटर साठी 

  • २-१/२ कप बेसन 
  • १/४ चमचे हळद 
  • १ चमचा ओवा 
  • १ /२  चमचा बेकिंग पावडर 
  • १ चमचा गरम तेल 
  • मीठ चवीनुसार 
  • पाणी गरजेनुसार 
स्टफिंग साठी 
  • २ चमचे तेल 
  • १/२ चमचे जीरे 
  • ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून 
  • २ चमचे आलं लसूण पेस्ट 
  • १ चमचा धने 
  • १ चमचा लाल मसाला 
  • १/२ चमचा हळद 
  • १/२ धने जीरे पावडर 
  • १ चमचा गरम मसाला 
  • १/२ चमचा आमचूर पावडर 
  • १ चमचा कसुरी मेथी 
  • ५ उकडलेले बटाटे 
  • मीठ चवीनुसार 
  • कोथिंबीर 
  • ८ ब्रेड स्लाइस 
  • तळण्यासाठी तेल 
  • १/२ कप पुदिना चटणी 
कृती : 
  • बॅॅटर साठी दिलेले साहित्य मिक्स करून घ्या. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा. जास्त पातळ करू नये. 
  • आता भाजी तयार करावयाची त्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात मग मिरच्या आणि पेस्ट टाकून मिक्स करा. धने थोडेसे लाटणीने स्मॅॅश करून ते पण टाका. बाकी सर्व साहित्य टाकून मिक्स करा वरून स्मॅॅश करून बटाटे टाका. मंद आचेवर ५ मिनिटे शिजवा. 
  • वरून कोथिंबीर घालून गॅॅस बंद करून भाजी थंड झाल्यावर ब्रेड ला चटणी लावून वरून भाजी पसरवून ब्रेड दुसरा स्लाइस ठेवा. 
  • हाताने थोडसं प्रेस करून मधून कापून घ्या. तेल तापत ठेवा त्यातले १ टेबलस्पून गरम तेल बॅॅटर मध्ये टाकून मिक्स करा. 
  • आता ब्रेड बॅॅटर मध्ये घोळवून मध्यम आचेवर तळून घ्या. 
अशा प्रकारे गरमागरम खमंग ब्रेड पॅॅटिस तयार होतील. 

No comments:

Post a Comment