साहित्य :
भाकरवडीचंं आवरणासाठी
- १०० ग्रॅॅम मैदा
- २ चमचे बेसन
- 1 चमचा गरम तेलाचं मोहन
- 1 चमचा मीठ
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा ओवा
- 1 चमचा जिरंं
- 1 चमचा सफेद तीळ
- ४ चमचे सुक खोबर
- २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- 1 चमचा जिरा पावडर
- २ चमचे धना पावडर
- २ चमचे लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- २ चमचे बारीक शेव
- 1 चमचा साखर
- २ चमचे चिंच गुळाची चटणी
- एका पसरट भांड्यात मैदा, बेसन, लाल तिखट, मीठ, ओवा, आणि तेलाचं मोहन टाकून, पाण्याने घट्ट गोळा मळून घ्यायचा.
- एका कढईत जिरंं, तीळ, सुक खोबर, आणि कोथिंबीर परतून मिक्सर मधून वाटून घ्यायची. वाटलेल्या मिश्रणात लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, मीठ, साखर, शेव टाकून परत वाटून घ्यावं.
- मळलेल्या पिठाची पारी लाटून त्यावर चिंच गुळाची चटणी लावावी.
- त्यावर तयार सारण आणि शेव पसरवावा. त्याचा रोल बनवून, त्याचे काप करून घ्यावेत.
- तयार काप कमी आचेवर तेलात ७/८ मिनिटासाठी खरपूस तळून घ्यावेत.
- अशा प्रकारे कुरकुरीत खमंग भाकरवडी तयार होईल.
.jpg)
No comments:
Post a Comment