Sunday, April 16, 2023

घरी बनवा हॉटेलसारखा चविष्ट मसाला डोसा रेसिपी

 मसाल्याचे साहित्य :- 

  • चार ते पाच बटाटे उकडून चिरलेले 
  • एक कांदा चिरलेला 
  • तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरलेल्या 
  • तेल 
  • लसूण आणि आल्याची पेस्ट 
  • मोहरी 
  • हळद
  • हिंग 
  • कढीपत्ता 
  • उडीद डाळ 
  • चवीनुसार मीठ 
मसाला तयार करण्याची कृती :- 

  • कढईत तेल टाकून तापल्यावर मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, उडीद डाळ, हिरवी मिरची, लसूण-आल्याची पेस्टची फोडणी करावी. 
  • कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. 
  • खमंग वास सुटल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्या 
  • मीठ टाकून एकजीव करावे. 
  • चवीसाठी थोडी कोथिंबीर पेरावी आणि भाजी तयार करून ठेवावी. 
मसाला डोसा तयार करण्याची कृती :- 
  • गॅॅसवर तवा गरम करावा. 
  • पाणी शिंपडून अंदाज घ्यावा. 
  • तव्याच्या मध्यभागी डोसा बॅॅटर ओतावे. 
  • कडेने तेल सोडून डोसा खरपूस करावा. 
  • वरून थोडे बटर डोसाला लावावे. 
  • मसाला त्यावर लावून पसरून घ्यावा. 
  • दोन्ही बाजूने डोसा दुमडवा आणि मस्त पैकी सर्व्ह करावा. 









No comments:

Post a Comment