Thursday, April 27, 2023

नॅॅचरल आईस्क्रीम आता घरच्या घरी..


 

साहित्य :- 

  • १ वाटी दूध 
  • साय/फ्रेश क्रीम १ वाटी 
  • दुध पावडर १ वाटी 
  • आवडत्या फळाचा गर १ वाटी 
  • साखर चवीनुसार
     
कृती :- 

  • वरील सर्व जिन्नस (साखर सोडून) मिक्सरमध्ये एकत्र करून फिरवून घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेऊन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. 
  • नंतर तयार मिश्रण भांड्यात काढून डीप फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवावे.
     
  • फ्रीजचे कुलिंग थोडे वाढवावे. 
  • साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते. 
टीप :- 
        फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेऊ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकू, पपई, स्ट्राॅबेरी) घ्यावीत.  

No comments:

Post a Comment