साहित्य :-
- २ मोठे बटाटे उकडलेले
- १/२ कप साबुदाणा
- ५ मिरच्या
- १/४ कप चिरलेली कोथिंबीर
- १/२ जिरे
- ३ टीस्पून शेंगदाणा कूट
- १ टीस्पून जिरेपूड
- २ टीस्पून शिंगाडा पीठ
- चवीपुरते मीठ
- तळण्यासाठी तेल.
- १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचित पाणी घाला.
- साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी.
- साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
- मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून बारीक करा. पाणी घालू नये.
- शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे,जिरेपूड , शिंगाडा पीठ घालून नित मळून गोळा बनवा.
- तेल तापत ठेवा. प्लास्टिकवर तेलाचा हात लावून प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडा.
- पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने अजिबात पलटू नये, अशाने ती तुटते.
- त्यावेळी झाऱ्याने अलगद तेलात बुडवावी.
- छान ब्राऊन रंग आल्यावर काढून घ्या. गरमागरम चटणीबरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment