Thursday, April 27, 2023

कोरियन व्हेज पॅनकेक


 

साहित्य :- 

  • भाज्या :-  कांद्याची पात, मश्रुम्स, गाजर, सिमला मिरच्या, रंगीत मिरच्या, पत्ता कोबी वैगेरे, आवडीच्या कोणत्याही भाज्या. चिरून १ लहान बाऊलभर. 
  • बाइंडिंगसाठी - ऑल पर्पज फ्लार, मैदा किवा गव्हाचे किवा तांदळाचे पीठ- ३-४ चमचे 
  • सॉससाठी- सोया सॉस ३ चमचे, राईस व्ह्निेगर २ चमचे, तिळाचे तेल किवा भाजलेले तीळ.
कृती :- 

  • सॉस- सोया सॉस, व्हिनेगर एकत्र मिक्स करा, त्यात काही थेंब तिळाचे तेल - सेसमी ऑईल घाला, हवा तर हॉट सॉस घाला. झाला सॉस तयार! 
  • तिळाचे तेल नसेल तर भाजलेले तीळ वरून घाला. मस्त चटपटीत चवीचा सॉस तयार. 
  • पॅॅॅॅनकेक- वर दिलेल्या पैकी असतील त्या भाज्या बारीक चिरून घ्या. मी एक लहान बोल भरून भाज्या घेतल्या. त्यात आवडीचे सिझनिंग घाला, जसे हिरव्या मिरच्या, आले लसणाचे बारीक तुकडे, किवा नुसते मीठ, मिरी पण चालेल. आता बॅटर तयार करण्यासाठी १ बाऊल भाज्यांना अगदी २-३ चमचे पीठ आणि थोडे पाणी असे कालवा. गरज वाटली तर अजून एखादा चमचा. पीठ जास्त नाही झाले पाहिजे.
     
  • बाइंंडिंगसाठी जस्ट इनफ किवा थोडे कमीच पीठ वापरायचे आहे. 
  • मिडीयम हायवर पॅॅॅॅनकेक नीट खरपूस भाजून घ्या. भाज्या मस्त क्रिस्पी होऊ देत. 
  • झाला पॅॅॅॅनकेक तयार! सॉस बरोबर गरम गरम खा!  

No comments:

Post a Comment