Thursday, April 27, 2023

घरच्या घरी बनवा सोयाबीन वडी भाजी





सोयाबीन वडी भाजी बनवण्याचे साहित्य :- 

  • २५० ग्रॅॅम सोय वडी 
  • २ कांदे 
  • २ टोमॅॅटो 
  • १ हिरवी मिरची 
  • २०० मिली दही गोडसर ताज 
  • ६-७ लसूण पाकळ्या 
  • ४-५ लाल सुकी मिरची 
  • ६-७ चमचे तेल 
  • १ चमचा तिखट 
  • १/२ चमचा हळद 
  • १ चमचे धणेपूड 
  • १ चमचा मीठ / या टेस्ट नुसार 
  • १ चमचा जीर 
  • १ छोटा तुकडा जावित्री 
  • १ तुकडा दालचिनी 
  • ५-६ मीरे 
  • ३ लवंग 
  • १ तेज पान 
  • १ चमचा गरम मसाला 
  • १ चमचा कसुरी मेथी 
  • २ चमचे कोन्ठीम्बीर धुवून चिरलेली 
  • २०० मिली पाणी. 

सोयाबीन वडी भाजी बनवण्याची कृती :- 
  • प्रथम मोठ्या भांड्यात पाणी गरम करणे आणि सोय वडी त्यात टाकून ५ मिनिट उकळून घेणे आणि काडून एका वाटी मध्ये थंड होऊ देणे. 
  • थंड झाल्या की त्यातल हाताने दाबून पूर्ण काढून घेणे. गॅॅसवर पॅॅनमध्ये २ चमचे तेल टाकून सोयावडी त्यात परतणे. 
  • वडीचा कच्चे पण जाईल आणि थोडा रंग बदलेल. सोयावडी एका वाटी मध्ये काढून थंड होऊ देणे. मसाले काढणे सोयावडीत टाकण्याचे. तिखट मीठ, हळद, धणेपूड, दही, कुटलेल लसूण हे सगळं सोयावडीत टाकणे आणि मिक्स करणे आणि १५ मिनिट झाकून ठेवणे. 
  • १५ मिनिट मेरीनेट करून झाकून ठेवणे. कांदे लांब-लांब चिरून घेणे आणि गॅॅसवर कढईत २ चमचे तेल टाकून काळे लालसर होईपर्यंत तळून घेणे.   
  • तळलेले कांदे प्लेट मध्ये काढून घेणे. त्यात तेलात टोमॅॅटो, लालमिरची जरा परतणे आणि टलेल्या कांद्या सोबत मिक्सरच्या पॉॉटमध्ये बारीक करून घेणे. 
  • सगळे खडे मसाले घेणे. गॅॅस्वर पॅॅनमध्ये राहिलेल सगळ तेल टाकणे आणि एक-एक करून सगळे मसाले टाकणे परतणे आणि कांदा, टोमॅॅटो, मिरची बारीक केलेला वाटण टाकणे. 
  • १ मिनिट परतणे आणि मेरीनेट केलेली सोयावडी टाकणे. 
  • पाणी टाकणे तेल सुटे पर्यंत परतणे. नंतर कसुरी मेथी, गरम मसाला टाकणे आणि फ्लेम वर झाकण ठेवून ५ मिनिट शिजू देणे. 
  • वरून कोथिंबीर टाकणे मिक्स करणे आणि एका वाटी मध्ये काढणे वरून कोथिंबीर टाकणे. आणि गरमागरम चपाती बरोबर सर्व्ह करणे.  
 

No comments:

Post a Comment