Thursday, April 27, 2023

रमजान ईद स्पेशल शिरखुर्मा!




साहित्य :-
१) अर्धा पाकीट बारीक शेवया, २) २ लिटर दूध, ३) अर्धा कप साखर, ४) १ चमचा वेलची पावडर, ५) १ कप बदाम, काजू आणि पिस्ता, ६) अर्धा कप फ्रेश साय, ७) अर्धा चमचा केशर, ८) अर्धा चमचा मनुका, ९) अर्धा चमचा गुलाब पाणी, १०) १ चमचा बटर.


कृती :- सर्वात आधी शेवया एका पॅॅनमध्ये बटर गरम करून शेकून घ्या. आता यात साखर मिसळून उकळलेल दूध घाला. हळूहळू ढवळत राहा. घट्ट झाल्यावर त्यात सुका मेवा टाका. यात आवडीप्रमाणे गुलाब पाणी घाला. शेवटी साय घालून १० मिनिट अजून शिजू द्या. शिजवल्यावर वरून केशर आणि वेलची पावडर टाका. 

                 अशा प्रकारे तयार आहे आपला स्पेशल शिरखुर्मा. 

No comments:

Post a Comment