साहित्य :-
- २५० ग्रॅम चिकन ( शक्यतो बोनलेस )
- दही १ मोठा चमचा
- आलं लसूण पेस्ट - १,.५ चमचा
- लाल मिरची पावडर
- हळद
- तेल
- मीठ
- लिंबू १
- सजावटीसाठी कोथिंबीर
- चिकन स्वच्छ धुवून घ्या.
- एका भांड्यात चिकन, दही, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, जराशी हळद, थोडं मीठ लावून दोन तास मॅॅरीनेट करून घ्या.
- दोन तासानंतर गॅस स्टोव्ह चालू करा.
- त्यावर फ्राइंग पॅॅन ठेवा, पॅॅनमध्ये एक चमचा तेल टाका.
- तेल गरम झाले की एक चमचा आलं लसूण पेस्ट टाका.
- आलं लसूण पेस्ट छान परतून घ्या. आता मॅॅरीनेट केलेले चिकन पॅॅनमध्ये टाका, फुल गॅस करून दोन मिनिटे चिकन परतून घ्या, असं केल्याने चिकन ज्युसेस चिकनमध्येच लाॅक होतात.
- दोन मिनिटानंतर गॅस सीम करा आणि चिकन झाकून निवांत शिजू द्या पाणी आटेपर्यंत.
- मध्ये मध्ये बघा पाणी आटेल का ते.
- चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर मीठ आणि मिरची पावडर टाकून १० मिनिटे परतून घ्या.
- गॅस बंद करा. वरून एक लिंबू पिळून टाका. कोथिंबीर टाकून सजवा.
- लेमन चिकन फ्राय तयार.
No comments:
Post a Comment