Saturday, April 22, 2023

चविष्ट तुरडाळ पकोडा रेसिपी


 

            आज आपण चविष्ट तुरडाळ पकोडा कसा बनवायचा पाहणार आहोत. चला तर मग बघूया या रेसीपीचे साहित्य आणि कृती. 

साहित्य :- 

  • १ वाटी तुरडाळ 
  • १ कांदा बारीक चिरून 
  • ४ ते ५ लाल मिरच्या 
  • ४ ते ५ कडीपत्ता पाने बारीक चिरून 
  • १ इंच आल्याचा तुकडा किसून 
  • चिमुटभर हिंग 
  • चवीपुरते मीठ 
  • तळण्यासाठी तेल.
 कृती :- 

  • प्रथम तुरडाळ निवडून धुवून घ्यावी. नंतर किमान दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. 
  • मिक्सर जारमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यावी. 
  • नंतर जारमध्ये निथळलेली तुरडाळ घालावी. त्यातच लाल मिरचीची पेस्ट घालून मिश्रण भज्याच्या पिठाप्रमाणे बनवून घ्यावे.
  • आता तयार पीठ बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता, आले, हिंग आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. 
  • आता गॅसच्या मध्यम आचेवर कढईत तेल गरम करावे. 
  • भजाचे पीठ परत एकदा मिक्स करावे. आच मंद करून भज्याचे पीठ गरम तेलात सोडावे. 
  • भजी हलक्या सोनेरी रंगावर आणि कुरकुरीत झाली.
  • तयार गरम तुरडाळ पकोडा चटणी अथवा सॉस सोबत सर्व्ह करा. 
          अशाप्रकारे तयार आहे चविष्ट तुरडाळ पकोडा रेसिपी.




No comments:

Post a Comment