लोणचे हे जेवणामध्ये एक वेगळेच समाधान देते. आंबा, लिंबू लोणच्या चा स्वाद तुम्ही घेतलाच आहात परंतु लसूण लोणचे हा एक आगळावेगळा प्रकार आहे. चला तर मग बघूया लसणाचे लोणचे घरच्या घरी कसे बनवले जाते.
साहित्य :-
- १ किलो लसूण
- ४५ ग्रॅम मेथी
- मोहरी
- हळद
- शोप
- कलोंजी
- मीठ
- तिखट आणि सरसोचे तेल आवश्यकतेनुसार.
- सर्वप्रथम लसूण वाळवून एका भांड्यात काढून घ्यावे व त्यात मीठ, तिखट, मेथी, कलोजींं, शोप आणि मोहरी टाकून भांड्याला ३ दिवस झाकून ठेवावे.
- नंतर त्यात इतके तेल टाकावे की लोणचं त्यात मुरून जाईल व १ आठवड्याने ते लोणचं वापरण्यास काढू शकता.
- अशाप्रकारे लसणाचे लोणचे तयार आहे.
No comments:
Post a Comment