आज आपण पाहणार आहोत कोबी मटारचंं लोणचंं कसे बनवतात.
साहित्य :-
- कोबी ५०० ग्रॅम
- मटार २५० ग्रॅम
- सरसोची डाळ १ मोठा चमचा
- मोहरीची डाळ १ मोठा चमचा
- १/२ चमचा हळद
- १ चमचा तिखट
- १ मोठा चमचा मीठ
- १/२ चमचा आमचूर पावडर
- जाडसर वाटलेली शोप १ चमचा
- हिंग चिमुटभर
- २ मोठे चमचे तेल.
- कोबीचे लहान तुकडे करून मटारचे दाणे काढून घ्यावे.
- दोघांना ५ मिनिटे उकळत्या पाण्यात टाकून २ मिनिटाने काढून घ्यावे व एका सुती कापडावर २४ तासासाठी वाळत ठेवावे.
- तेल गरम करून त्यात पहिले हिंग व सर्व मसाले टाकावे. या तयार मसाल्यात वाळलेली कोबी आणि मटारचे दाणे टाकून एकजीव करावे.
- २-३ दिवसानंतर या लोणच्याला पुरी किवा पराठे सोबत खावयास द्यावे.
No comments:
Post a Comment