शेवयाचा उपमा हा अतिशय चविष्ट आणि हेल्दी नाश्ता आहे. तुम्हाला हा बनवणंदेखील अतिशय सोप आहे.तसेच अगदी कमी वेळेत हा नाश्ता तयार होतो. त्यासाठी जास्त वेळ घालवण्याची गरज भासत नाही.
शेवयाचा उपमा बनवण्याचे साहित्य :-
- शेवया
- कांदा, टोमॅॅटो, सिमला मिरची, वाटाणे, फरसबी, गाजर
- कोथिंबीर
- मिरची
- हळद
- चवीनुसार मीठ
- फोडणीच साहित्य (जिरे, मोहरी, हिंग,)
शेवयाचा उपमा बनवण्याची कृती :-
- एका भांड्यात पाणी घेऊन उकळवायला ठेवा.
- त्यात चार थेंब तेल घाला आणि शेवया शिजवायला ठेवा. पाणी उकळल अर्थात शेवया शिजल्या की पाणी काढून टाका.
- नंतर दुसऱ्या कढईत तेल घ्या.
- त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरची घाला आणि मग कापलेला कांदा परतावा. मग तुम्हाला हव्या त्या भाज्या त्यामध्ये कापून घाला.
- वरून शेवया घाला. नीट मिक्स करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून नित शिजवून घ्या. वरून मीठ आणि कोथिंबीर घाला.
No comments:
Post a Comment