Monday, April 24, 2023

अळूची चविष्ट भाजी


           अळूची भाजी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की यासाठी वडीचा नाही तर भाजीचा अळू तुम्हाला घ्यावा लागेल. शिवाय पावसाळ्यात अळू खाजरा असल्यामुळे भाजी निवडताना हाताला तेल लावा आणि भाजीत चिंच गुळ घालायला विसरू नका. 


साहित्य
:- 

  • पाच-सहा अळूची पाने 
  • अर्धी वाटी शेंगदाणे 
  • दोन चमचे चणाडाळ 
  • चिंचेचा छोटा गोळा 
  • गूळाचा खडा 
  • दोन चमचे गोड मसाला 
  • चवीपुरते मीठ
  • दोन हिरव्या मिरच्या 
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट. 
कृती
:- 
अळूची पाने स्वच्छ धुवून, पुसून, देठ वेगळे करून पाने आणि देठ बारीक चिरावे शेंगदाणे आणि चणाडाळ दोन तास आधी पाण्यात भिजत घालावे आणि कुकरमध्ये उकडून घ्यावे. फोडणीसाठी कढई गॅॅसवर ठेवावी आणि त्यात तेल, मोहरी, हिरव्या मिरची, हळद, लाल तिखट, हिंगाची फोडणी करावी. त्यावर बारीक चिरलेली अळूची पाने आणि देठ टाकावे. मीठ टाकून दहा मिनिटे भाजी शिजू द्यावी. भाजी घट्ट वाटत असेल तर वरून थोड कोमट पाणी शिंपडावे शेंगदाणे आणि चणाडाळ टाकून ते भाजीत मिक्स करावे. चिंचेचा गोळा आणि गुळाचे पाणी टाकून भाजी परतून घ्यावी. वरून गोडा मसाला टाकून भाजीला फक्त एक वाफ द्यावी. 

                         गरम वाफाळता भात अथवा भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. 

 

No comments:

Post a Comment