Monday, April 24, 2023

कोबी पुलाव



साहित्य :- 

१) २ कप भात

२) २ कप कोबी बारीक चिरलेला

३) १/२ कप सोयाचे तुकडे पाण्यात भिजवलेले

 ४) १ चमचा जिरे 

५) २ तमालपत्र

६) १ इंच दालचिनी

७) १ जावित्री 

८) १ चमचा हळद

९) १ चमचा तिखट

१०) १ चमचा काळी मिरी पावडर 

११) १ कांदा बारीक चिरून 

१२) १ इंच आले किसलेले 

१३) १ लसूण पाकळी बारीक चिरून 

१४) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 

१५) कोथिंबीर चिरलेली 

१६) १ चमचा तूप, तेल (आवश्यतेनुसार)

१७) चवीनुसार मीठ. 

कृती :- कोबी पुलाव बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करा. त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी आणि जावित्री घाला. नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट घालून कांदा मऊहोईपर्यंत परत. कांदा मऊझाल्यावर त्यात कोबी आणि सोय चंक्स घालून मिक्स करून कोबी मऊ होईपर्यंत शिजवा. आता सर्व मसाले घालून मिक्स करा.  मिक्स केल्यानंतर त्यात शिजवलेला भात, कोथिंबीर, मीठ, तूप घालून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. 

      अशा प्रकारे गरमागरमकोबी पुलाव सर्व्ह करा. हा पापडासोबत मसालेदार कोबी पुलाव सर्व्ह करा.    


     

No comments:

Post a Comment