लॉकडाऊनचा आनंद घेत खूप जणांनी वेगवेगळ्यारेसिपी शिकून घेतल्या. वेगवेगळे पदार्थ आणि जिन्नस आतापर्यंत खूप जणांनी ट्राय केले असतील. केक हा या कोरोनाच्या काळात खूप जणांनी इतका मिस केला की, घरच्या घरी कमीत कमी साहित्यातून बेकिंगचीही सवय अनेकांना लागून घेतली. तर अनेकांनी चॉकलेट रेसिपीज ट्राय केल्या. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या बिस्किटांचा केक बनवणे हे देखील नेकानी ट्राय केले आहेत. तसेच बिस्किटांपासून बनवलेले केक हे इतके परफेक्ट असतात की, तुम्हाला इतर कोणताही केक खाण्याची इच्छा होणार नाही. बिस्किटांपासून तयार केलेले हे सोप्यात सोपे केक.
ओरिओ बिस्कीट पासून केक बनवण्याचे साहित्य :- - ओरिओ बिस्किटांचा पुडा
- १ मोठा चमचा तेल
- १ मोठा टोप
- पाणी (आवश्यकतेनुसार) केक टिन)
- जाळी
ओरिओ बिस्कीट पासून केक बनवण्याची कृती :- सगळ्यात आधी ओरिओ बिस्कीट घेऊन तुम्ही त्याचे क्रीम काढून टाका. आणि एक बाजूला सगळी बिस्कीट आणि दुसऱ्या बाजूला त्यातले फक्त क्रीम ठेवा. त्यानंतर फक्त बिस्कीट घेऊन त्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी. केकची पूड चांगली झाल्यावर ती एका भांड्यात काढून त्यामध्ये एक चमचा तेल आणि रिबीन इतके केकचे बॅॅटर होईल एवढे त्यामध्ये पाणी घाला. त्यानंतर तयार बॅॅटर एका ग्रीस केलेल्या भांड्यात करून मायक्रोव्हे व मध्ये हे बॅॅटर ५ मिनिटांसाठी बेक करा आणि गॅॅसवर करत असाल तर तुम्ही पाच मिनिटांसाठी केक ठेवा. केक तयार झाला हे पाहण्यासाठी तुम्ही त्यामध्ये टूथपीक घालून बघा. टूथपीक स्वच्छ निघाला म्हणजे केक झाला असे समजा आता हा केक तुम्ही काढून ठेवलेली क्रीम मेल्ट करून सजवा. ही क्रीम मेल्ट करण्यासाठी मायक्रोव्हेव करा किंवा डबलबॉयलरमध्ये मेल्ट करून मग वर पसरवा. हा केक छान लागतो. अशा प्रकारे आपला घरगुती ओरिओ बिस्कीटपासून केलेला घरच्याघरी केक तयार आहे.
No comments:
Post a Comment