साहित्य :
- १ लिटर दुध
- दोनशे ते अडीचशे ग्रॅॅम साखर
- २-३ चिमटी केशर
- १/२ चमचे वेलचीपूड
- केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.
- चिक आणि दुध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून आवश्यकता असल्यास अजून साखर घालावी.
- केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
- तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे.
- कुकरचे २ मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आट ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी, त्याच्यावर अजून एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आक बारीक करून मिनिटभराने बंद करावी.
- ५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत, गार होईस्तर हवेवर उघडेच ठेवावे. कोमटसर झाले की त्याचे चौकोनी तुकडे पाडावे.

No comments:
Post a Comment