साहित्य :
- ४ बांगडे
- १/२ लिंबू
- १/२ चमचे आलं लसूण पेस्ट
- १/२ चमचे हळद
- १/२ चमचे धने जीरे पूड
- २ चमचे कोकम आगळ
- ११/२ टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर
- २ टेबलस्पून तेल
- बांगडे चांगले साफ करून घ्या. त्याला लिंबू रस घालून घ्यावे तसेच आलं लसूण पेस्ट घालून घ्या.
- आता मसाला घालून घ्या म्हणजेच लाल तिखट, हळद, धनेजिरे पूड घालून घ्यावे. कोकम आगळ आणि मीठ घालून सर्व एकत्र करावे आणि त्याला सगळ्या बाजूंनी चांगले लावून घ्यावे.
- १५-२० मिनिट तसेच झाकून ठेवावे. ह्या माशांना जास्त वास येतो म्हणून यात कोकम घालावे म्हणजे वास कमी होतो. पॅॅनमध्ये तेल घालून गरम करत ठेवावे. आता माशांवर कॉर्न फ्लॉवर भुरभुरून घ्यावे आता पॅॅन मध्ये तेलावर चांगले भाजून घ्यावे.
- दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्यावे व सर्व्ह करावे. अशा प्रकारे चमचमीत बांगडा फ्राय तयार होईल.




No comments:
Post a Comment