Sunday, April 23, 2023

झटपट साबुदाणा कटलेट्स


 

आपण आज झटपट साबुदाणा कटलेट्सचे साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.

साहित्य :- 

  • साबुदाणा - १ कप 
  • उकडलेले बटाटे- ४ 
  • हिरवी मिरची - ५ ते ६ 
  • चिरलेली कोथिंबीर 
  • लाल तिखट  - १ टीस्पून 
  • गरम मसाला- अर्धा टीस्पून 
  • बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून 
  • मीठ - चवीनुसार 
  • तेल - तळण्यासाठी 
कृती :-
 

  • सर्वप्रथम साबुदाणा कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. 
  • नंतर सकाळी पाणी गाळून घ्या आणि बाहेर एका भांड्यात ठेवा. 
  • बटाटे उकळून मॅश करा. 
  • भिजवलेला साबुदाणा आणि मॅश केलेले बटाटे एकत्र मिक्स करा. 
  • बारीक चिरून हिरव्या मिरच्या, हिरवी कोथिंबीर घाला. मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट घाला. 
  • शेवटी बेकिंग सोडा घालून जरा ओल्या हाताने साबुदाण्याचे कटलेट्स बनवा. तळहाताने हलके दाबा. 
  • तयार कटलेट्स एका कढईत गरम तेलात हलके सोनेरी होईपर्यंत तळा. 
  • गरमागरम साबुदाणा कटलेट तयार आहेत, हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment